प्रतिनिधी: पाचोरा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा या साठी शासन स्तरावर वेगवेगळ्या अडचणीत पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आपापले कर्तव्य बजावत आहे त्यात काही रिकामं टेकडे व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरतांना आढळत आहेत वेळोवेळो सूचना देऊन देखील नागरिक कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तोंडावर मास्क न लावता रस्त्यावर फिरतांना आढळून येत आहेत.
सुचनेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे दि.२० एप्रिल २०२० पासून पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौ. शोभा बाविस्कर यांनी ५०० रुपये दंड ठोकण्याच्या सूचना दिली असता सकाळी रमेश येवले रा.पाचोरा या इसमास रुमाल अथवा मास्क न लावल्यामुळे ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. व या पुढे प्रशासनाच्या सूचनांचे जोकोणी काटेकोर पालन करणार नाही त्यावर पालिका प्रशासन कठोरपणे कारवाई करण्यात येणार आहे याचे सर्व नागरीकांनी आवाहन करण्यात येत आहे. अमळनेर नगरपरिषदेत असतांना देखील अमळनेर शहरासाठी शिस्तबद्ध स्वरूपात आपले कर्तव्य बजावत शोभा बाविस्कर यांनी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली होती. जिल्ह्यातील ही पालिका प्रशासनाची पहिलीच कार्यवाही आहे त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा