तर अमळनेर मध्ये गरीब व गरजूंना मिळणार शिवभोजनाचा ५ रुपयात लाभ.... - प्रहार Today

Breaking

Video

BANNER 728X90

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

तर अमळनेर मध्ये गरीब व गरजूंना मिळणार शिवभोजनाचा ५ रुपयात लाभ....


 प्रतिनिधी :अमळनेर
तालुका स्तरावरील समितीने गरीब व गरजू असलेल्या नागरिकांना शिव भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दोन सक्षम भोजनालय चालकाची निवड  करण्यात आली आहे.
अमलनेरातील सर्व गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा..तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

शासन परिपत्रकानुसार ६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२० दरम्यान शिव भोजन सुरू व्हावे या करिता टेंन्डर प्रस्ताव मागविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने मा. जिल्ह्याधिकारी जळगांव , यांच्या कडील पत्रानुसार अमळनेर तालुका समितीच्या दि.१७ एप्रिल २०२० रोजीच्या बैठकीनुसार दोन सक्षम भोजनालय चालकाची निवड करण्यात आली आहे. व कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर शिव भोजनालयात येणा-या गरीब व गरजू लाभार्थींना मूल्य ५ रुपये दर  ठेवण्यात आला आहे.
साई रेस्टॉरंट, बस स्थानक जवळ अमळनेर (भोजन चालक- संदीप विश्राम पाटील ) तसेच श्रीनाथ खानावळ ,धुळे रोड ,कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ अमळनेर (भोजन चालक- घन:श्याम चंदूसिंग परदेशी) या दोन भोजन चालकांना दररोज शासनाच्या इष्टकांनुसार ७५ थाळी मंजूरी संख्या देण्यात आली आहे.
अश्या दोन ठिकाणी शिव थाळी भोजनालयाचा उद्या दि २२ एप्रिल २०२० रोजी पासून शुभारंभ होत आहे. अमळनेर तहसीलदार मा. मिलिंंदकुमार वाघ यांनी सांगितले की, गरीब गरजूंसाठी हा शिव थाळी भोजन आहार असून त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशी माहिती देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा