प्रताप मिल गिरणी कामगारांचा वाली प्रहार - प्रहार Today

Breaking

Video

BANNER 728X90

शनिवार, १४ मार्च, २०२०

प्रताप मिल गिरणी कामगारांचा वाली प्रहार

प्रहार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारीनां निवेदन

प्रतिनिधी : अमळनेर

अमळनेर शहरात दि प्रताप स्पिनिंग, विविंग अँड मैन्युफक्चरींग कंपनी लि.
या नावाची कापड गिरणी १३ जुन १९०६ रोजी स्थापन झाली व १९०८ ला प्रत्यक्षात सुरु झाली. ह्या प्रताप कापड गिरणीत अमळनेर तालुक्यातील हजारो कर्मचारी गिरणी कामगार म्हणुन कार्यरत होते परंतु २००२ पासुन सदर कापड गिरणी बंद पडली. त्यानंतर या कापड गिरणीत कार्यरत असलेले हजारो गिरणी कामगार आर्थिक दृष्ट्या दुर्बल झाले. हजारो गिरणी कामगारांचा उदरनिर्वाहाचा स्त्रोत बंद पडल्यामुळे त्यांच्या परिवारांवर उपासमारीची वेळ आली. सदर गिरणी बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेल्या गिरणी कामगारांच्या मुलांना दस-या कुठल्याही

शासकिय व निमशासकिय सेवेत समाविष्ट करण्यात आले नाही हजारो गिरणी कामगारांना मिळणारा भविष्य निर्वाहनिधी हा अत्यल्प असून त्यात आज तागायत कोणतीही वाढ झालेली नाही.

तसेच वरील कापड गिरणी ही सुमारे १९५६ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे हस्तांनतरीत करण्यात आली.त्या नसार माहाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी नियम वरिल गिरणी कामगारांना लाग करणे आवश्यक होते. त्यातीलमहत्वाचा नियम म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन अधिनीयम १९८२ नुसार सेवानिवृत्ती वेतन या गिरणी

कामगारांना मिळणे आवश्यक होते. परंतु आज तागायत त्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळाला नाही. त्यामळे सदर गिरणी कामगारांची कुटूंबे या शासकिय लाभापासुन वंचित आहेत. तरी अमळनेर तालुक्यातील प्रताप कापड गिरणीत जे कर्मचारी कार्यरत होते त्यांना त्वरित पेंशन योजना लागू करण्यात यावी, आणि त्यांच्या भविष्य निर्वाह निधी मध्ये वाढ करण्यात यावी.
उद्या दि.१४ मार्च २०२० रोजी मा.ना.बच्चूभाऊ कडू (राज्य मंत्री) महाराष्ट्र राज्य यांना देखील पुढील पाठपुराव्यास सदर निवेदन देण्यात येणार असून कामगारांचा वाली प्रहार संघटना सदैव गिरणी कामगारांच्या पाठीशी राहील असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
निवेदन प्रसंगी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा.जयश्री दाभाडे
प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण पाटील, प्रहार अपंग क्रांती संघटना शहराध्यक्ष योगेश पवार, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदीप सैदाणे, संतोष  (नाना)पाटील , रामदास पाटील तसेच अनेक गिरणी कामगार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा